ब्रेकिंग

आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ बळकट करण्याची गरज. – प्रशांत वंजारे

 

यवतमाळ : देश विविध आघाड्यांवर संकटग्रस्त होत असतांना आपल्या देशातील मूलतत्त्ववाद्यांचा उन्माद चरमसीमेला पोहचला आहे. भारतीय संविधानाला पायदळी तुडवून धर्मराज्य निर्माण करण्याचा त्यांचा अघोरी संकल्प देशाची एकता आणि अखंडतेला ध्वस्त करणारा आहे. या धर्मांध झुंडीचा मुकाबला केवळ आंबेडकरी चळवळच करू शकते त्यासाठी आपल्याला आपली सांस्कृतिक चळवळ बळकट करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रशांत वंजारे यांनी केले. ते प्रा. सतेश्वर मोरे मित्र मंडळ शिरजगाव पांढरीच्या वतीने आयोजित आंबेडकरी संवाद संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राष्ट्र निर्माण करायचे असेल तर देशातील लोक धर्मविहिन पर्यायाने जातीविहिन होणे गरजेचे आहे. मूलतत्त्ववादी लोक धर्म आणि जातीचा उपयोग शस्त्रांसारखा करत असून देश आपल्याच अधिपत्याखाली रहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा अटीतटीच्या वेळी आंबेडकरी चळवळीने संवैधानिक राष्ट्र वाचवण्यासाठी कंबर कसणे गरजेचे आहे असेही वंजारे पुढे बोलताना म्हणाले.

आंबेडकरी संवाद संमेलनाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक कॅप्टन अशोक खनाडे हे होते. यावेळी आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक रमेश कटके आणि डाॅ. सिमा मेश्राम यांनी समयोचित विचार मांडले. संमेलनाचे प्रास्ताविक बापू रंगारी यांनी केले तर डाॅ. शरद मोरे यांनी आभार मानले.

उ द् घा ट की य कार्यक्रमानंतर सुप्रसिद्ध कवी सुनील वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन घेण्यात आले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन संजय घरडे यांनी केले. समारोपीय सत्रात ज्येष्ठ गायक भीमदास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरी गीतगायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सतेश्वर मोरे मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी प्रयत्‍न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!