राजकीय

भाजपाचे माजी आमदार प्रा. तोडसाम बांधणार मनगटावर ‘घड्याळ’

 

केळापूर मतदार संघात भाजपला खिंडार पडणार

घाटंजीत कार्यकर्त्याची बैठक

29 जुलै रोजी कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार

 

महेंद्र देवतळे / घाटंजी

…………………

आर्णी – केळापूरचे भाजपाचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम व तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक विश्राम गृहावर पार पडली. या बैठकीत पारवा, शिवणी, घोटी, पार्डी (नस्करी) जिल्हा परिषद विभागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबत चर्चा झाली. प्रा. राजु तोडसाम हे आपल्या कार्यकर्त्यांसह 29 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.

आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सह सहकारी संस्थेच्या निवडणूका लढण्याचा निर्धार करण्यात आला. तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रा. तोडसाम च्या शब्दाला होकार देऊन या नंतरच्या सर्व निवडणुका लढवीण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी घाटंजी पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश धुर्वे, भाजपा युवा मोर्चाचे माजी शहर अध्यक्ष विनय जाधव, प्रदीप ठोंबरे, सरपंच कणाके, प्रमोद गेडाम, अमोल गेडाम, गणेश चव्हाण, कृष्णा पेंडपवार, माजी सरपंच अनुप देठे, गजानन मस्के, सुर्यकांत कोहरे, अनिल मोचावार, नरेश चव्हाण या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आपण कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, राज्याचे उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार यांची भेट घेउन चर्चा केली. यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते आदींना विश्वासात घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

प्रा. राजु तोडसाम
माजी आमदार, आर्णी – केळापूर .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!