क्राईम न्यूजब्रेकिंग

मुलगी झाली म्हणुन विवाहितेला जिवंत जाळले

 

पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी येथील घटना

आरोपी नणंद जेरबंद

यवतमाळ : आपल्या मुलीचा लाड हाेणार नाही व मुलगी झाली म्हणुन त्रास देऊन विवाहितेस पेटवून दिल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील दातपाडी येथे घडली. पांढरकवडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन मृतक विवाहितेच्या नंणदेला अटक केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
माेनिका गणेश पवार रा. दातपाडी ता. पांढरकवडा असे मृतक विवाहितेचे नाव आहे. आशा सुनिल राठाेड असे फिर्यादीचे नाव आहे. माेनिका गणेश पवार हिचा सहा वर्षापुर्वी गणेश पवार यांच्या सोबत विवाह झाला होता. या दाेघांना सहा वर्षाचा मुलगा आणि 12 दिवसाची मुलगी आहे. पवार यांचे एकत्र कुटुंब आहे. माेनिकाची माेठी नणंद कांता संजय राठाेड या देखील दातपाडी येथे माहेरीच राहतात. या दाेघींत सातत्याने वाद हाेत हाेते. याबाबत माेनिका मला नेहमी सांगत हाेती. दरम्यान 8 जूलैला सायंकाळी पाच वाजता नणंद माया गाेपाल पवार यांनी माेनिकाच्या घरच्यांचा फाेन आला. माेनिका दुपारी दाेन वाजता घरी जळली असून तिला उपचारासाठी सेवाग्राम येथे दाखल केले आहे. दुस-या दिवशी नातेवाईक सेवाग्राम रुग्णालयात गेले. त्यावेळी तिच्या सासरची मंडळी उपस्थित हाेते.
माेनिकाला भेटल्यानंतर मला मूलगी झाल्याने माझी नणंदेच्या मुलीचे लाड हाेणार नाहीत या कारणाने ती माझ्यावर चीडून हाेती. त्यातूनच तिने माझ्यावर अंगावर आॅईल टाकून मला पेटवून दिले. त्यानंतर काय घडले मला काहीच माहिती नाही असे तीने नातेवाईकांना सांगितले. तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तक्रार केली नव्हती.दरम्यान आज रविवार 18जुलै रोजी माेनिका हिचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर अन्याय करणा-यांविराेधात तिची नणंद कांता संजय राठाेड हिच्या विराेधात तक्रार केल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून कांता राठाेड हिला संशियत म्हणून अटक केली आहे. पुढील तपास पाेलिस उपनिरिक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!