ब्रेकिंग
शिष्यवृत्तीच्या लाभापासून विद्यार्थी वंचित

यवतमाळ : वसतिगृह बाह्य राहणा-या विद्यार्थ्यांना शासनामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. आदिवासी विद्यार्थ्यांना सत्र २०२०-२१ या सत्राची अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही. या गंभीर प्रकाराबाबत बिरसा ब्रिगेडच्यावतीने शुक्रवारी (ता.१६)ला जिल्हाधिका-यांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्त, अप्पर आयुक्त आदींना निवेदन देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाल योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करूनही सत्र २०२०=२१ चा लाभ अजूनपर्यंत मिळाला नाही. याबाबत चौकशी करुन या योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना त्वरित देण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. बिरसा ब्रिगेडचे महा. प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ. अरविंद कुडमेथे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले आहे.