ब्रेकिंगविदर्भ

भ्रष्टाचार करणा-यांची गय नाही- किशोर तिवारी

यवतमाळ : कोरोना काळात सुविधा उपलब्ध करुन देतांना काही शासकीय अधिका-यांनी साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. अशा अधिका-यांची गय केली जाणार नाही. या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर भाऊ तिवारी यांनी सांगीतले. ते यवतमाळ येथे पत्रकार परीषदेत बोलत होते.

कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देतांना साहित्याची खरेदी करण्यात आली. काही ठिकाणी मास्क अडीचशे रुपयांचे तर वीस हजाराची मशीन चार लाखाची खरेदी केल्याचे दाखविण्यात आले आहे. हा सर्व प्रकार अंत्यंत गंभीर असून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. किशोर तिवारी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयाशी संबंधीत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परीषद घेऊन आढावा बैठकीची माहिती दिली. मजुर संस्थेत तर महागड्या गाड्या घेऊन फिरणारे सदस्य बनले असून राजरोसपणे भ्रष्टाचार सुरु असल्याचे त्यांनी सांगीतले. या संस्थेचे अध्यक्ष डॉन बनले असून ई टेंडरींग न करता कामे लाटत असल्याचे तसेच खुलेआम भ्रष्टाचार सुरु असल्याचे तिवारी यांनी सांगीतले. गौन खनीजाची लुट सुरु असून यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे. या क्षेत्रातील संघटीत गुन्हेगारी मोडीत काढणार असून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आता याकडे स्वता लक्ष देणार आहे. या रेती तस्करांवर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश सुध्दा किशोर तिवारी यांनी दिले. कोरोना होऊन गेलेल्या शेतक-यांचे फुफ्फुस कमजोर झालेले असतात त्यामुळे त्यांनी किटक नाशकांची फवारणी करु नये असे आवाहन सुध्दा किशोर तिवारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!