महाराष्ट्रसंपादकीय व लेख

ॲड. राजेंद्र महाडोळे म्हणजे अन्याय ग्रस्तांसाठी, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी धडपडणारे आंदोलक नेतृत्व 

 माणूसकी जपणारं व्यक्तीमत्व. काळाची पाऊले ओळखणारा ध्येयवेडा माणूस. एक कुशल प्रशासक, व्यवस्थापक, रंजल्या, गांजल्यांना माणूसकीचा हात देणारा समाजसेवक. मातीशी नाळ जुडलेला माणूस. कदाचित ही ओळख अपुरी असेल एवढ्या उंचीवर आज ते आहेत. त्यांनी राजकीय क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण केले आहे. म्हणुनच ॲड. राजेंद्र महाडोळे जिल्ह्यातील भल्याभल्यांना घाम फोडणारे एक ब्रँड नाव उदयास आले आहे.
.

ही अत्यंत गौरवाची बाब आहे. आज त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण राज्यात कोव्हीडयोध्दाची भूमिका बजावली आहे. परंतु, प्रत्यक्षात कुठेही प्रसिध्दी माध्यमांपूढे गाजावाजा न करता गरीब जनतेसाठी माणूसकी जपणारा सच्चा सेवक असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श घेण्याची आजच्या युवा पिढींना आवश्यकता आहे.
घरची परिस्थिती सर्वसाधारण. कोणताही राजकीय वारसा त्यांना परंपरागत मिळालेला नाही, हे विशेष मानायला हवे. वडील शेतकरी. आई घरकामात व्यस्त. पारवा त्यांची कर्मभूमी अशी त्यांची पारिवारिक पार्श्वभूमी होती. शालेय जिवन जगत असताना त्यांना क्रीडा क्षेत्रात आवड होती. त्यांनी राष्ट्रीय मैदाने गाजवित जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर कोरले. पुढे त्यांनी महाविद्यालयीन जिवनापासून गरिबांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार त्यांनी केला. राष्ट्रीय ओबिसी क्रांती दल, विदर्भ विद्यार्थी संघर्ष मंच, फळ व भाजी विक्रेता संघ, अखिल भारतीय माळी महासंघ, अशा विविध सामाजिक संघटनेचं नेतृत्व व वंचित बहुजन आघाडी अशा पक्षाचा विदर्भ प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द त्यांच्या कार्यातून सर्वसामान्यांना न्याय देणारी आहे. आणि म्हणूनच आपल्या नावाचा ठसा संपूर्ण राज्यात उमटविला. जवळपास त्यांनी 20 उच्चस्त पद भूषविले पण त्यांनी कधी गर्व केला नाही. गरिब जनतेच्या प्रश्नाला हळव्या मनाचा कार्यकर्ता मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. पुढे त्यांनी 1998 पासून यवतमाळ जिल्ह्या मधील भाजी विकणाऱ्यासाठी हक्काची जागा मिळवून देण्यासाठी लढा उभारला गेल्या 25 वर्षांपासून विविध आंदोलने केली.कष्टकरी व अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून दिला. परिणामी त्यांच्या कार्याने यवतमाळकरांची मने जिंकली. शून्यातून प्रगती करत आजच्या युवापिढीपूढे नवा आदर्श निर्माण केला आहे. कोणतेही क्षेत्र असो लहान मोठे न मानता सच्च्या मनाने कार्य केले की यश मिळते, हे त्यांनी दाखवून दिले.
संघर्षातून मिळालेले यश प्रत्येकाला पचविता येत नाही. त्यासाठी जिद्द व मेहनतीची आवश्यकता असते. यश मिळण्यासाठी कोणत्याही शॉटकर्ट पध्दतीचा अवलंबू करू नका.कर्तुत्व मोठे असल्या शिवाय नाव मोठे होत नाही. त्यामुळे कार्य असे करा की तुमचे नाव चार व्यक्तीत चांगल्या कार्यासाठी घेतल्या गेले पाहिजे. जिवन जगताना अडचणी येतात, अनेक अडथळे येतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यातून हार न मानता पुनश्च कष्टाने कामाला लागता. संधी मिळताच संधीचे सोने करा, असा मौलीक संदेश देखील त्यांनी आजच्या युवापिढीला दिला.
ॲड. राजेंद्र महाडोळे यांचा 5 ऑगस्टला या जन्मदिवसाच्या औचित्याने समाजातील हजारो बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची भन्नाट कल्पना त्यांना सुचली. राज्यातील मेट्रो सिटी मधील विविध नामाकिंत कंम्पनीमध्ये हजारो बेरोजगारांना काम लावून देण्या साठी “रोजगार संकल्प अभियान “राबवीण्याचे त्यांनी हातात घेतले. राज्यात अनेक प्रस्थापित राज्यकर्ते आहेत. परंतु समाजा मध्ये आर्थिक परिवर्तनासाठी चळवळ कोणीही राबिविली नाही. आज ग्रामीण व शहरी भागातील लाखो युवक बेरोजगार आहेत. युवक ही देशाची व समाजाची ऊर्जा आहे. ती रोजगारा अभावी नष्ट होत आहे. युवक रोजगारा अभावी हतबल झाला असून अंधकारमय आयुष्य जगत आहे. परंतु कोणतीही राजकीय सत्ता हातात नसताना ॲड. राजेंद्र महाडोळे सारख्या नेतृत्वाने जेवढे जमेल तेवढ्या युवकांचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या उभं करण्याचा केलेला संकल्प म्हणजे प्रचंड मोठी देशसेवा आहे. अशा समाजसेवेतून राजकारण्यांनी, सत्तेत असणाऱ्यांनी असे कार्य करायला हवेत पण त्यांना का सुचत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी रक्तात गरिबीची जाणीव असावी लागते. तेव्हाच स्वहीत सोडून दुसऱ्याच्या हितासाठी धडपड कराल असे त्यांनी सांगितले.

रोजगार संकल्प अभियानातून हजारो बेरोजगारांच्या हाताला मिळणार काम
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अनेकांच्या हातचे काम गेल्याने जगावे कसे या विवंचनेत अनेक कुटूंब आहेत. जगण्याचे साधन नसल्याने अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्यादेखील केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. परंतु कोणत्याही राज्यकर्त्यांना अशा बेरोजगारांना काम मिळावे , बेरोजगारांचे घर उजळावे या उद्देशाने प्रयत्न केल्याचे कोणतेही दाखले नाही. याच्या विपरित कष्टक-यांसाठी पुढाकार घेत ॲड. राजेंद्र महाडोळे यांच्या नेतृत्वात टप्प्या-टप्याने मेट्रोसिटीत रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. या संधीचा मागासवर्गीय समाजातील ग्रामीण व शहरी बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय ओबिसी क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी केले आहे.

त्यासाठी खालील रोजगार संकल्प अभियान समितीशी संपर्क साधावा. राजेंद्र घाटे, अमोल गुरनुले.. 9011915747, राजेंद्र मांदाडे.. 8766774512, राम भेंडारे. 9511831909…गणेश राऊत, विठ्ठलराव नागतोडे,

 

-सतीश बाळबुधे (9503565754)

यवतमाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!