ब्रेकिंगविदर्भ

मुख्य निवडणूक अधिकारी यांनी घेतला यवतमाळ जिल्ह्याचा आढावा

यवतमाळ:  सुव्‍यवस्थित मतदार शिक्षण आणि मतदार सहभाग कार्यक्रम, स्वीप (सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन प्रोग्राम) कार्यक्रमाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मतदार शिक्षण, मतदार जागरूकता आणि मतदारांची माहिती वाढविण्यासाठी नेमून दिलेल्या पंच उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आज दिल्या.

            स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्यात आज सर्वप्रथम अमरावती विभागाची दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण केले. बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी विवेक जॉनसन(आर्णी), सावन कुमार(पुसद), उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शरद जावळे(वणी), शैलेश काळे (राळेगाव), अनिरूद्ध बक्षी (यवतमाळ), जयंत देशपांडे (दिग्रस),  स्वप्नील कापडनीस (उमरखेड) प्रामुख्याने उपस्थित होते.

            निवडणुक अधिकारी यांनी नेमून दिलेल्या पंच उपक्रमांमध्ये नवयुवक, स्त्रिया, अपंग, तृतीय पंथीय, शहरी नागरिक यापैकी एका लक्ष्य गटाला अनुसरून प्रत्येक तालुक्यात एका वेबसंवादाचे आयोजन करणे, शाळा-महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळे यांची स्थापना, चुनाव पाठशाळांची स्थापना, मतदार जागरूकता मंडळाची स्थापना करणे व त्यांचे संपर्क यादीचे अद्ययावतीकरण, समन्वय, सक्षमीकरण करणे, तसेच जिल्हा आणि मतदारसंघ निवडणूक कार्यालयांनी फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम या समाजमाध्यमांची खाती उघडणे आणि ती सक्रिय करणे या बाबींचा समावेश आहे.

            जिल्हाधिकारी येडगे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मतदार नोंदणीची सद्यस्थिती, नोंदणी वाढविण्यासाठी केलेले नावीन्यपूर्ण उपक्रम, समाजमाध्यमांचा वापर, निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाला व मतदार जागरूकता मंडळाच्या सद्यस्थितीबाबत माहितीचे सादरीकरण केले.

            बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!