ब्रेकिंग
यवतमाळ पॉलिटेक्निकमध्ये डॉ. एस. जे. पाटील रूजू

यवतमाळ : तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे उपसचिव डॉ. एस. जे. पाटील यांची बदली यवतमाळ येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच्या विभागप्रमुखपदी करण्यात आली आहे.
डॉ. पाटील हे २०१६ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईच्या तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नागपूर येथे उपसचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी १९९५ पासून शासकीय तंत्रनिकेतन कराड, आर्वी व नागपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. डॉ. एस. जे. पाटील यांच्या दीर्घ अनुभवाचा, ज्ञानाचा संस्थेतील विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे यांनी व्यक्त केली आहे