विदर्भ

खोदकामांनी लावली यवतमाळातील रस्त्यांची वाट

यवतमाळ:  शहरात नगरपालिकामार्फत भूमिगत गटार पाईपलाईन टाकण्याचे कामे सुरु आहे. सदरचे खोदकाम झाल्यानंतर बुझविल्या जात नसल्याने रस्त्याची संपूर्ण वाट लावली जात अाहे. सद्यस्थितीत नागरिकांच्या घरातून निघणारे सांडपाणी रस्त्यावर जमा होत आहे, त्यामुळे शहरातील प्रभाग क्र ३मधील अंबिकानगरमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिका-यांना भीम टायगरसेनेतर्फे मंगळवारी (ता. १३) निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील प्रभाग क्रं. ३ अंबिका नगर, मल्लाना लेआऊट येथील दलित वस्तीमध्ये सुमारे दोन वर्षाअाधी काँक्रीट व डांबरी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. परंतू, भूमिगत गटार योजनातर्गत आज या प्रभागातील संपूर्ण रस्त्यांना खोदकाम करून नेस्तनाबूत करून शहराच्या सौदर्यीकरणाची देखील बाट लावलेली आहे. रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून भूमिगत गटार पाईपलाईन टाकले जात आहे परतू, काम झाल्यानंतर देखील सदरचे खोदकाम बुझविल्या जात नाही व त्याचे कॉक्रीटीकरण केल्या जात नाही. सदरच गटार अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांच्या घरातून निघणारे सांडपाणी रस्त्यावर व खुल्याजागेवर जमा होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकाचे आरोग्य देखील धोक्यात येत आहे. ठेकेदार, नगर परिषदेचे इजिनियर अधिकारी हे नगर परिषद अथवा येथील लोक हिताचे काम करताना दिसून येत नाही. भूमिगत गटार योजनेचे कार्य आजमितीस पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असून ते कामे देखील ढेपाळले आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न येथील लोकांसमोर उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीत भूमिगत गटार योजनेची कामे उत्कृष्ट करण्यासंबंधाने आपल्या स्तरावरून योग्य ते पाऊल उचलण्यात यावे. तसेच निकृष्ट होत असलेल्या व ज्या कुणाचे ठेकेदारासोबत संगनमत असेल अशा अधिका-यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा भीम टायगर सेनेस या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल व त्याच्या परिणामास न.प. शासनच जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असा इशारा सुध्दा भीम टायगर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास मोटघरे यांनी मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!