ब्रेकिंग

राज्यात मर्दानी खेळ असोसिएशनने कोरले यवतमाळचे नाव

पंचवीसही विध्यार्थी ठरले मानकरी, गोल्ड, सिल्व्हर अन कांस्य पदकांचा समावेश

 

यवतमाळ:

राज्यस्तरीय ऑनलाईन मर्दानी खेळ अजिंक्यपद स्पेर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यवतमाळ तालुक्यातील बाभूळगाव येथील पंचवीस मुलांनी सहभाग घेतला होता. यात पंचवीस पैकी पंचवीस विध्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावत महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्याचे नाव कोरले. बुधवार, दि. १४ जुलैला बाभूळगाव शहरातील सांस्कृतिक भवन येथे विजेत्या विदयार्थ्यांना पदक आणि प्रमाणपत्र वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळ जिल्हा सेवाधिकारी पद्माकरजी ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, तहसीलदार विठ्ठल कुंभरे, संजय खोडे, सतीश मानलवार, प्रकाश भूमकाळे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, दिनेश रोकडे, सुरज भाकरे, अनिकेत पोहोकार, मयूर पिसे, मिलिंद नावाडे, आदी उपस्थित होते.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील प्रीतम सोनवणे या विध्यार्थ्याने गावात मोफत मैदानी खेळ प्रशिक्षण केंद्र सुरू केले. यात लाठीकाठी, नोंचॉक, तलवारबाजी, दांडपट्टा आणि भाला आदींचा समावेश आहे. वर्षभरात पाहता-पाहता शंभर ते दीडशे मुला-मुलींना यात सहभाग नोंदविला. अश्यात नुकतेच राज्यस्तरीय ऑनलाईन मर्दानी खेळ अजिंक्यपद स्पर्धा मान्यता मर्दानी खेळ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मर्दानी खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील पंचवीस मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. दरम्यान यात पंचवीस पैकी पंचवीसही सहभागी मुला-मुलींनी गोल्ड, सिल्व्हर अन कांस्य पदक पटकावत यवतमाळ जिल्ह्याचे बाभूळगावचे नाव महाराष्ट्रात कोरले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यामध्ये लाठीकाठीत गोल्ड मेडल प्रीतम सोनवणे, आदर्श ठाकरे, आनंदी आसरकर, तर सिल्व्हर सागर सोनवणे, प्रजवल राणे, वांशिक जांभळे, सुमेधा गुप्ता, भक्ती मिश्रा, संजना ढोबळे, कीर्ती ढोबळे, अर्णव बीरे, जागृती लांजेकर, स्वर्नेश रोकडे, अक्षरा आसरकर तसेच कांस्य पदक हरीश काम्बडी, आकाश अर्जुने, प्रथमेश कात्रे, वैष्णवी बारेकर, जनव्ही घ्यारे, केतकी टेके, आर्या बऱ्हाणपूर, सोनाली चौधरी, आस्था गुप्ता, सार्थक लांडगे, आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन मयूर पिसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मैदानी खेळ असोसिएशनचे प्रशिक्षक प्रीतम सोनवणे, मयूर शर्मा, हरीश काम्बडी, सागर सोनवणे, सत्यम पाटणकर, हितेश दुधनकर, सोनू शर्मा, सचिन ढोबळे, ललित जैन, मयूर वानखडे आदींंनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!