विदर्भ

ओबीसीच्या न्याय हक्कासाठी रासपचा रास्तारोको

यवतमाळ:

देशातील व राज्यातील सत्ताधार्यांनचा बेबनावामुळे ओबीसी प्रवर्गातील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. सत्ताकेंद्रातुन बहुजनांचा वाटा कमी होणे हे एकदंरित संपूर्ण बहुजनांवर अन्याय करणारे आहे. या विरोधात सर्वसामान्यांनचा व बहुजनांचा आवाज बुलंद करण्यासाठी,ओबीसी प्रवर्गाचा न्याय हक्कासाठी महादेव जानकर यांच्या आदेशानुसार विदर्भ अध्यक्ष चेतन आगलावे यांच्या नेतृत्वात आज बसस्थानक चौक यवतमाळ येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
ओबीसी वर्गाच्या आरक्षणासंबंधित संपूर्ण कायदेशीर कारवाई लवकरात लवकर पुर्ण करून महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षण अबाधित राखावे असे आवाहन करत ,लवकरात लवकर ओबीसी आरक्षण पुर्ववत न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षा तर्फे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा चेतन आगलावे यांनी दिला आहे.
आंदोलनानंतर लगेच आरक्षण कायम करण्या बाबतचे जिल्हाधिकार यांना विदर्भ अध्यक्ष चेतन आगलावे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय समाज पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अमोल डफाळ,सामाजिक कार्यकर्ते राजेश गोळे, नासीर खान जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी, प्रदीप कोरी शहर अध्यक्ष, प्रशांत नखाते शहर उपाध्यक्ष, अंकुश मस्के शहर अध्यक्ष युवा आघाडी, समीर शाह शहर उपाध्यक्ष युवा आघाडी, अब्दुल तौकीर तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक, जुनेद खान शहर अध्यक्ष अल्पसंख्याक, नयन राऊत तालुका अध्यक्ष घाटंजी, अक्षय गोफणे तालुका उपाध्यक्ष घाटंजी,विभाग प्रमुख निलीमा संजय पाटील, संजय पाटील, मो जाकीर मो सलीम,शहबाज शेख,
नितीन बैतुले,रवींद्र सपकाळ,धीरज फुन्ने सह शेकडो चा संख्येत रासप कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!