राजकीयविदर्भ

कोरोनायोध्दा ललित जैन यांचा सत्कार

 

यवतमाळ:
महाराष्ट्र युवक काँग्रेस तर्फे कोरोना रूणांच्या मदतीकरिता आयोजित “कोविड-१९ कंट्रोल रूम” यात यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी यु.काँ.जिल्हा सरचिटणीस ललित जैन यांना देण्यात आली होती.ललित यांनी आपले कर्तव्य उत्कृष्ठपणे सांभाळत कोरोना रूग्णांना बेड उपलब्ध देणे,रेमडेसिवीर व टॅाकीझुमाब यासारख्या औषधांचा अन्न व औषध पुरवठा अधिकारी यांच्याशी समन्वय साधून उपलब्ध करून देणे,अपंग रूग्णांना लसीकरणासाठी मदत करणे याप्रकारे समाजकार्याची जबाबदारी पार पाडली.विदर्भ दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ.नाना पटोले यवतमाळ येथे माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी आले असता ललित जैन यांचा कोरोनाकाळात केलेल्या कार्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,माजी मंत्री शिवाजीराव मोघे,माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आ. कुणाल पाटील, अतुल लोंढे, नाना गावंडे, आमदार वजाहत मिर्झा,राहूल ठाकरे, प्रवीण देशमुख, अशोक बोबडे, अरुण राऊत, बाळासाहेब मांगुळकर,देवानंद पवार,अनिल गायकवाड,अतुल राऊत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!