राजकीयविदर्भ

अमृत योजनेच्या फिल्टरवर शिवसैनिकांचा राडा

भ्रष्टाचाराची चौकशी होतपर्यन्त काम होऊ देणार नाही- पिंटु बांगर

यवतमाळ : यवतमाळकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी मंजुर करण्यात आलेल्या अमृत योजनेच्या फिल्टर प्लॅन्ट वर शिवसैनिकांनी राडा केला. या योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत शहरातील शिवसैनिकांनी योजनेचे काम बंद पाडले. दरम्यान जो पर्यन्त या कामातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होत नाही तोपर्यन्त काम होऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी दिला आहे.

यवतमाळ शहराला बेंबळा धरणातील पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केन्द्र तसेच राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले आहे. टेस्टींग दरम्यान पाच वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या योजनेत वापरण्यात येणारे पाईप निकृष्ट दर्जाचे आहे. कामाचा कालावधी संपल्यानंतरही नागरीकांना या योजनेचे पाणी अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे सदर काम करणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका तसेच त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पिंटु बांगर यांनी राज्य शासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे चार दिवस पुर्वीच पिंटु बांगर तसेच शिवसैनिकांनी जीवन प्राधीकरणच्या कार्यालयात घुसून अधिका-यांना धारेवर धरले होते. या प्रकरणात अद्यापतरी चौकशीच्या हालचालींना वेग न आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहे. यवतमाळ शहराला निळोणा तसेच चापडोह धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरातील लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढल्याने आता या दोन्ही धरणातील पाणी सुध्दा शहराला कमी पडायला लागले आहे. त्याअनुषंगाने केन्द्र सरकार तसेच राज्य सरकारने 302 कोटीचा निधी देऊन अमृत योजना मंजुर करुन दिली. या योजनेचे काम नाशीक येथील आळके कन्स्ट्रक्शन कंपणीला मिळाले आहे. कामाचा कालावधी संपला तरी पाईप लाईन टाकण्याचे तसेच त्याच्या टेस्टींग चे काम सुरु आहे. याआधीही टेस्टींग दरम्यान टाकळी तसेच गळव्हा परीसरात पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पाण्याच्या फोर्स मुळे पाईपचे मोठमोठे तुकडे काही मिटर अंतरावर पडल्याचे आढळून आले होते. पाण्याचा फोर्स खूप जास्त राहत असल्यामुळे एखादा मोठा अपघात शहरात होण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. टाक्यांचा दर्जा सुध्दा उच्च स्तरीय तज्ञ अधिका-यांकडून तपासण्यात यावा अशी मागणी पिंटु बांगर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!