ब्रेकिंगराजकीय

मोदी सरकारने लोकांच्या अंगातील रक्त काढले, आ. नाना पटोले यांचा मोदी सरकारवर घाणाघात

यवतमाळ : कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोक-या गेल्या असून, बेरोजगार झाले आहे. लोकांना जेवन मिळणे कठीण झाले असून, सात वर्षात मोदी सरकारने लोकांच्या अंगातील रक्त काढल्याचा घाणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा करून पाच राज्यात निवडणूका घेतल्या. दुस-या लाटेतून जनतेला वाचविण्यासाठी उपाययोजना केल्या नाही. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करतांना मोफत लस पुरविण्याची घोषणा केली. मात्र तिस-या लाटे बाबत ब्र शब्दही काढला नाही. जनतेच्या जिवन मरणाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोपही आ. नाना पटोले यांनी केला आहे. कोरोनाच्या काळात जनतेला मदत करण्याची सुचना पक्षप्रमुख सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दिली होती. राज्यातील कार्यकर्त्यांनी जनतेची सर्वतोपरी मदत केली. त्याचा आढावा घेवून कोरोना योद्धा असलेल्या कार्यकर्त्यावर कौतुकाची थाप देण्यासाठी आल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षणावरुन राजकारण करण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोपही काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला आहे. यावेळी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे,आ कुणाल पाटील,शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, संध्याताई सव्वालाखे, नाना गावंडे, नागपूर, अतुल लोंढे, प्रवक्ता आ वजाहत मिर्झा, टीकाराम कोंगरे, बाळासाहेब मांगुळकर, देवानंद पवार, प्रवीण देशमुख,अशोकराव बोबडे, अनिल गायकवाड,अरुण राऊत , मनीष पाटील, प्रफुल मानकर, किरण कुमरे, सुरेश चिंचोळकर, अतुल राऊत, वैभव जवादे, जावेद अन्सारी, ललित जैन, अरुण ठाकूर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!