आरोग्य व शिक्षणब्रेकिंगविदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात ६० हजार रुग्ण कोरोनामुक्त ; शनिवारी २० जणांचा मृत्यू, ५२९ पॉझेटिव्ह

 

 

यवतमाळ : गेल्या पंधरवाड्यात ८३ टक्क्क्यांच्या आसपास असलेला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) आता ९० टक्क्यांच्यावर गेला आहे. चालू आठवड्यात सतत सहाव्या दिवशीसुध्दा कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यासाठी हे नक्कीच दिलासादायक चित्र असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सामुहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 60496 जणांनी कोरोनावर मात केली असून बरे होण्याचे प्रमाण 90.28 टक्के आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 464 ने जास्त आहे. जिल्ह्यात 529 जण पॉझेटिव्ह तर 993 जण कोरोनामुक्त झाले असून 20 जणांचा मृत्यु झाला. दोन मृत्यु जिल्ह्याबाहेरील (नांदेड आणि वाशिम) आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 12 मृत्यु, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दोन तर खाजगी रुग्णालयातील सहा मृत्यु आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 60 वर्षीय महिला, तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 54 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 65 वर्षीय महिला, घाटंजी येथील 60 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 59 वर्षीय पुरुष, वणी येथील 27 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 48 वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये वाशिम येथील 60 वर्षीय महिला आणि दारव्हा येथील 69 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 23 वर्षीय महिला, दिग्रस येथील 60 वर्षीय महिला, वणी येथील 70 वर्षीय पुरुष व 71 वर्षीय महिला, पुसद येथील 47 वर्षीय पुरुष आणि किनवट (जि. नांदेड) येथील 73 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

 

 

तालुका निहाय आकडेवारी

शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 529 जणांमध्ये 324 पुरुष आणि 205 महिला आहेत. यात पांढरकवडा येथील 83 पॉझेटिव्ह रुग्ण, बाभुळगाव 57, यवतमाळ 52, आर्णि 51, दारव्हा 45, घाटंजी 38, पुसद 31, राळेगाव 31, झरीजामणी 31, कळंब 27, वणी 26, दिग्रस 22, महागाव 19, उमरखेड 10, नेर 4, मारेगाव 1  आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे.

 

 

989 बेड उपलब्ध

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दहा डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 989 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 400 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 177 बेड शिल्लक, दहा डीसीएचसीमध्ये एकूण 516 बेडपैकी 167 रुग्णांसाठी उपयोगात, 349 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 636 उपयोगात तर 463 बेड शिल्लक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!