एकतर्फी प्रेमाचा बळी : गुप्तीने भोसकुन भावी शिक्षीकेची हत्या

पुसद (यवतमाळ ) : एक तर्फी प्रेमातून एका युवकाने गुप्तीने सपासप वार करून भावी शिक्षीकेची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना पुसद तालुक्यातील रामपूरनगर (सावरगाव गोरे) येथे आज शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) रा. रामपूरनगर (सावरगाव गोरे) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपीचे नाव आहे. सुवर्णाचे शिक्षण एच. एस. सी. डी. एड पर्यंत झाले होते. गावातच राहणारा आरोपी आकाश आडे हा अनेक दिवसापासून सुवर्णावर एकतर्फी प्रेम करीत होता. त्याने भावी शिक्षीकेला आपण तुझ्यावर प्रेम करीत असल्याचे सांगितले होते. परंतू सदर भावी शिक्षीकेने त्याला प्रतिसाद दिला नाही. दरम्यान आज १५ मे रोजी सुवर्णा चव्हाण हीचे आई, वडील, भाऊ बाहेरगावी लग्नाला गेले होते. या संधीचा फायदा घेत आरोपी आकाश हा त्सा भावी शिक्षीकेच्या घरात घुसला. यावेळी आकाशने आपल्या जवळीन गुप्तीने पोटात सापासप वार करून तीची जागीच हत्या केली. या घटनेची वार्ता गावात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या बाबची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनमा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आले. हत्या केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला होता. पोलिसांनी त्याला धनसळ येथील जंगलातुन ताब्यात घेतले. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल चावडीकर करीत आहे.