विदर्भ

बाभूळगावच्या कोविड सेंटरमध्ये लवकरच ऑक्सीजन सुविधा

 

खासदार भावना गवळी यांनी दिल्या जिल्हाधिका-यांना सुचना

यवतमाळ :  बाभूळगाव येथे कोविड सेंटर मध्ये ऑक्सीजन ची सुविधा नसल्यामुळे रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नुकतेच बाभूळगाव येथील नागरीकांनी खासदार भावनाताई गवळी यांना निवेदन देऊन ऑक्सीजनची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. या संदर्भात खासदार भावनाताई गवळी यांनी यवतमाळ जिल्हाधिका-यांना सुचना दिली असून लवकरच ऑक्सीजन ची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांना उपचारासाठी यवतमाळला जावे लागते. त्या ठिकाणीसुद्धा बेड उपलब्ध होत नाही. या रुग्णांना वेळीच व योग्य उपचार तालुक्यातच मिळावे, यासाठी बाभूळगाव येथे ऑक्सिजन खाटांचे अद्ययावत कोरोना रुग्णालय सुरू करण्यात यावे, यासाठी आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे नुकतीच केली. या मागणीची दखल घेत खासदार भावनाताई गवळी थेट जिल्हाधिका-यांना सुचना देत बाभूळगाव येथे ऑक्सीजन ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. आता जिल्हा प्रशासन सुध्दा कामाला लागले असून लवकरच बाभूळगाव येथे ऑक्सीजनची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोरोनाने सध्या संपूर्ण देशभरात हाहाकार माजविला असून वाढती कोरोना रूग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच यवतमाळ जिल्हयात सुध्दा मृत्यूदर झपाट्याने वाढत असल्याचे भयावह चित्र पहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांसह अनेक दिग्गज व्यक्तीही मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाने ग्रामीण भागात पाय पसरविले असून बाधित कोरोना रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावा, यासाठी बाभूळगाव शहरात ऑक्सिजनयुक्त खाटांचे उपचार केंद्र निर्माण करण्यासाठी खासदार भावना गवळी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी नगरसेविका मदिना परवीन शब्बीर खान, सोनाली अभय तातेड, माजी नगरसेवक नईम खान, माजी सरपंच डॉ. रिखबचंद तातेड, माजी उपसरपंच शब्बीर खान, माजी ग्रामपंचायत सदस्य अभय तातेड, सामाजिक कार्यकर्ता धीरज रूमाले, अजिज कुरेशी, संजय राऊत, किरण मदने, सचिन इंगोले, आतिश तातेड, चेतन लोहटे, भरत भुराने, लिंबा कुलाल, मो. राजिक, योगेश कन्नाके तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रशांत वानखडे, शिवसेनेचे वसंत जाधव, सुधीर कडुकार यांनी केली होती. ही मागणी आता लवकरच पुर्ण होणार आहे.

ऑक्सीजन सुविधा आवश्यक

कोरोनाचा संसर्ग ग्रामीन भागात मोठया प्रमाणात वाढला आहे. त्याअनुषंगाने तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सीजनची सुविधा असणे गरजेचे झाले आहे. अशी सुविधा तालुका स्तरावर उपलब्ध झाल्यास रुग्णांना सोईचे ठरणार आहे. याबाबत जिल्हाधिका-यांसोबत माझे बोलणे झाले असून बाभूळगाव सह महत्वाच्या तालुकयाच्या ठिकाणी ऑक्सीजन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.

भावनाताई गवळी
खासदार, यवतमाळ-वाशिम

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!