अन् दुस-या व्यक्तीचा दिला मृतदेह ; संतप्त नातेवाईकांचा शाह हॉस्पीटलमध्ये राडा

यवतमाळ : येथील प्रसिद्ध विधितज्ज्ञ एड. अरुण गजभिये यांचे येथील शाह हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मृतदेह ऐवजी दुस-यांचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. संतप्त नातेवाईकांनी शाह हॉस्पिटमध्ये राडा घातला.
या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून अवधूतवाडी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
येथील बाजोरीया नगरातील रहिवासी तथा जिल्हा बार कॉन्सीलचे माजी अध्यक्ष एड. अरुण गजभिये यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना शहरातील शाह हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दरम्यान शनिवारी रात्री एड. गजभिये यांचा मृत्यू झाला. आज रविवारी सकाळी या बाबतची माहीती नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. नातेवाईक मृतदेह घेवून पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात गेले होते. यावेळी नातेवाईकांनी एकदा चेहरा पाहावा म्हणून बांधून असलेला मृतदेह सोडला. यावेळी सदर मृतदेह ॲड. गजभिये यांचा नसून दुस-याच व्यक्तीचा असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट शाह हॉस्पिटल गाठून डॉक्टरांना जाब विचारुन राडा घातला. त्यामुळे हॉस्पिटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून अवधूतवाडी पोलिसांना पाचारण करण्यात आले. यापूर्वीही घाटंजी तालुक्यातील रुग्णाचा मृत्यू झाल्याने या हॉस्पिटमध्ये तोडफोड झाली होती. त्यानंतर पुन्हा तोडफोड झाल्याने हे हॉस्पिटल वादाच्या भोव-यात सापडले आहे.
आम्ही मृतदेह दिलाच नाही
दुस-या व्यक्तीचा मृतदेह दिल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी शाह हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली. या घटनेसंदर्भात हॉस्पिटल प्रशासनाची बाजु जाणुन घेतली असता, आम्ही मृतदेह दिला नाही अशी प्रतिक्रीया डॉ. सारिका शाह यांनी दिली.‘तो’ मृतदेह सेवानिवृत्त जमादाराचा
एड. अरुण गजभिये यांच्या मृतदेहाच्या जागी दिलेला मृतदेह हा सेवानिवृत् सहाय्यक फाैजदार दिगांबर शेळके यांचा असल्याची माहिती समाेर आली आहे. शेळके यांची तब्बेत .बिघडल्याने यांना शाह हॉस्पिटलमध्ये भरती केले हाेते. त्यांचाही काल शनिवारी मृत्यू झाला.