विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू; 841 पॉझेटिव्ह

 

यवतमाळ:  जिल्ह्यात 841 जण पॉझेटिव्ह आणि 910 जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच 20 जणांच  मृत्यु झाला आहे. शनिवारी एकूण 7559 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 841 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6718 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7205 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2685 तर गृह विलगीकरणात 4520 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 61805 झाली आहे. 24 तासात 910 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 53142 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1458 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.12 , मृत्युदर 2.36 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 75, 68 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 44 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 48 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 25, 66 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 55 वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील 70, 51 वर्षीय पुरुष, नांदेड येथील 52 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 72, 69 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 60 वर्षीय महिला, कळंब येथील 74 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय महिला आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये महागाव तालुक्यातील 65 वर्षीय व राळेगाव येथील 65 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 50, 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 841 जणांमध्ये 512 पुरुष आणि 329 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 126 पॉझेटिव्ह रुग्ण, दारव्हा 90, पुसद 85, दिग्रस 80, झरी 76, वणी 68, पांढरकवडा 57, घाटंजी 45, आर्णि 42, नेर 39, बाभुळगाव 37, मारेगाव 33, कळंब 21, महागाव 16, उमरखेड 13, राळेगाव 7 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 471233 नमुने पाठविले असून यापैकी 468566 प्राप्त तर 2667 अप्राप्त आहेत. तसेच 406761 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 रुग्णालयात 763 बेड उपलब्ध

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सहा डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 29 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 763 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 365 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 212 बेड शिल्लक, सहा डीसीएचसीमध्ये एकूण 360 बेडपैकी 172 रुग्णांसाठी उपयोगात, 188 बेड शिल्लक आणि 29 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 701 उपयोगात तर 363 बेड शिल्लक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!