ब्रेकिंग

कोरोनाने २५ जणांचा मृत्यू

 

यवतमाळ : जिल्ह्यात २५ जणांने मृत्यू झाला असून, ७६८ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर जिल्ह्यात सलग दुस-या दिवशीही कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त असून, ९९४  जण कोरोनामुक्त झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये सहा आणि खाजगी रुग्णालयात दोन मृत्यु झाले. तसेच एकूण मृत्युपैकी दोन मृत्यु नांदेड आणि अमरावती  जिल्ह्यातील आहे.

रविवारी एकूण ४७२७ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ७६८ जण नव्याने पॉझेटिव्ह आले. तर ३९५९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6491 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती २४९८ तर गृह विलगीकरणात ३९९३ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ५४७६० झाली आहे. २४ तासात ९९४ जण कोरानामुक्त झाले आहे.‌ जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ४६९४३ आहे. तर जिल्ह्यात एकूण १३२६ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर १२.७५ असून मृत्युदर २.२४ आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील २ पुरुष आणि २ महिला, यवतमाळ तालुक्यातील २ पुरुष, वणी येथील ३ पुरुष, तालुक्यातील १ पुरुष, दारव्हा येथील १ पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील १ पुरुष, आर्णि येथील १ पुरुष, तालुक्यातील १ महिला, दिग्रस येथील १महिला, माहूर येथील १ पुरुष आणि धामणगाव येथील १ पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये वणी येथील १ महिला, तालुक्यातील १ पुरुष, उमरखेड येथील १पुरुष, पांढरकवडा येथील १ पुरुष व १ महिला आणि राळेगाव येथील १ पुरुष तर खाजगी रुग्णालयात वणी येथील १ पुरुष आणि पुसद येथील एका पुरुषाचा मृत्यु झाला.तर यवतमाळ येथील १४२ पॉझेटिव्ह रुग्ण, घाटंजी ११८, उमरखेड १०७, पांढरकवडा ७२, वणी ६३, मारेगाव ५६, कळंब ४३, महागाव ३४, दारव्हा ३०, पुसद २६, नेर २५, झरी २०, बाभुळगाव १५, राळेगाव ६, दिग्रस ५, आर्णि ३ आणि इतर शहरातील ३ रुग्ण आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!