
कोलकत्ता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने भाजपला चारीमुंड्या चित केले. तृणमुल काँग्रेसने २०० चा आकडा पार केला आहे. तर भाजपला ८० जागावर समाधान मानावे लागले. त्यामुळे सलग दुसऱ्यादा पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची सत्ता कायम राहणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसला २०८ जागा मिळाल्या आहे. तर भारतीय जनता पक्षाला ८० जागा मिळाल्या आहे. ममता बॅनर्जी यांचा असलेला मतदारसंघ नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी मोठ्या संख्येने विजयी झाल्या आहेत. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.