ब्रेकिंग

थरार! : वावटळीत उडाला पाळणा, चिमुकल्याचा मृत्यू

यवतमाळ : हवामानात बदल झाला असून, सुसाट वारा व विजेचा कळकळाट होतांना दिसत आहे. अचानक वावटळीत चिमुकला झोपून असलेला पाळणा आकाशात उडाला. वावटळीत १५ मिनीट चिमुकल्यासह पाळणा फिरून जमिनीवर कोसळला. या घटनेत दिड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना आर्णी तालुक्यातील लोणी येथे शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी चिमुकल्याच्या आईने टाहो फोडला.
मंथन सुनिल राउत रा. लोणी असे मृतकाचे नाव आहे. सुनिल राउत यांच्या घरी लोखंडी रॉडला पाळणा बांधला होता. १ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे मंथनला पाळण्यात टाकले होते. अशातच अचानक वावटळ येवून राउत यांच्या घराच्या टिनाचे छप्पर उडाले. जमिनीपासून ५० ते १०० फुट उंचीवर पाळणा उडुन गरगर फिरून १५ ते २० मिनीटानंतर जमिनीवर पडला. अंगावर थरकार उडविणा-या या घटनेत चिमुकल्या मंथनचा जागीच मृत्यू झाला. यावेळी चिमुकल्याच्या आईने टाहो फोडला. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेत सुनिल राउत यांच्या घराचेही प्रचंड नुकसान झाले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!