वणीत व्यापा-मध्ये खडाजंगी

वणी : दुकानाचे शटर का उघडले या कारणावरून दोन व्यापा-यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. एका व्यापाऱ्याच्या भाऊबंधांनी मिळून दुसऱ्या व्यापाऱ्याला व त्याच्या भावाला मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली आहे.
शहरातील मयूर इलेक्ट्रॉनिक्स व आझाद इलेक्ट्रॉनिक्स ही दोन्हीही दुकान समोरासमोर आहेत. २७ एप्रिलला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आझाद इलेक्टॉनिक्सचे मालक आकाश राजकुमार अमरवाणी (२९) यांनी दुकानात ठेवलेली बीलं पाहण्याकरिता दुकानाचे शटर उघडले. मयूर इलेक्ट्रॉनिक्सचे मालक करण मुकेश बत्रा (२४) व त्याचे भावंडं आकाश अमरवाणी यांच्या दुकानावर चालून गेले. त्यांनी आकाश अमरवाणी याला अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. आकाश अमरवाणी यांना मारहाण होतांना पाहून मध्यस्थी करिता गेलेल्या त्यांच्या भावालाही या तिघांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाण प्रकरणाची आकाश अमरवाणी यांनी २९ एप्रिलला दुपारी ३ वाजता पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी करण मुकेश बत्रा (२४), पुनीत मुकेश बत्रा (२९) व मनीष बत्रा (४५) सर्व रा. वणी या तिघांवरही भादंवि च्या कलम २९४, ३२३,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.