लहान भावा पाठोपाठ मोठ्या भावाने सोडला श्वास

कय्युम पठाण @ महागाव (यवतमाळ)
देशात कारोनाने थैमान घातला असून, अनेकांचा श्वास रोखला आहे. कोरोनाने लहान भावाचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसानंतर मोठ्या भावाचा मृत्यु झाला आहे. शहरातील दमकोंडवार परिवारावराला या दुख:द प्रसांगाला सामोरे जावे लागत आहे. अचानक कर्ती व जनाव मुलाचा मृत्यू झाल्याने दमकोंडवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमोल लक्ष्मण दमकोंडवार (४०), आशिर्वाद लक्ष्मण दमकोंडवार (२९) रा. महागाव अशी मृत भावंडाची नावे आहे. महागाव येथील सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मणराव दमकोंडावार यांचा मोठा मुलगा अमोल व लहान मुलगा आशिर्वाद या दोघांना ही कोरोनाची बाधा झाली. त्यांना नांदेड येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना आशिर्वाद याची प्रकृती बिघडली व त्यात त्याचा मृत्यु झाला. अमोलची प्रकृती सुधारत असतांना पुन्हा प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला. अमोल हा उमरखेड न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होता तर आशिर्वाद हा डेली निड्स चा व्यवसाय करत होता. घरातील दोन्ही कर्ते मुले असे अचानक सोडुन गेल्याने दमकोंडावार परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
अमोल ने कायद्याचे पदवी शिक्षण घेत वकिली करीत अनेक लोकप्रिय वृत्तपत्रांमधुन पत्रकारिता केली. कायद्याचा अभ्यास करीत असतांना निवड समिती मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होवुन न्यायालयात कनिष्ठ लिपिकांची नोकरी मिळविली. अतिशय मनमिळाऊ व अडल्या नडलेल्यांना मदत करणारा अमोल असा अचानक निघुन गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अमोल च्या पश्चात्य वृद्ध वडील, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व बहीण असा आप्त परिवार आहे .