क्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ

सॅनिटायजर पिल्याने इसमाचा मृत्यू

 

वणी (यवतमाळ ): दारुची तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना चार दिवसापूर्वी घडली होतो. पुन्हा सॅनिटायझर पिल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. शहरातील माळीपु-यात आज सकाळी हि घटना घडली.

अनिल चंपतराव गोलाईत (४७) असे मृतकाचे नाव आहे. शासनाने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर प्रशासनाने ५ एप्रिल पासून शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जाहीर केला. त्या आदेशानुसार तालुक्यातील बियरबर व दारू दुकानांनाही सील लावण्यात आले. नंतर काळ्या बाजारात अव्वाच्यासव्वा दराने दारू विक्री सुरु झाली.

तालुक्यात मोठा मजूरवर्ग असून तो बहुअंशी दारूचे व्यसन करतो. या मजूरवर्गाची दारू एक गरज झाली आहे. बंद काळात जोपर्यंत पावत होती, तोपर्यंत काळ्या बाजारातून त्यांनी दारू खरेदी केली. पण अवैध दारू विक्रेत्यांनी दिवसानुरूप दारूच्या किमती वाढविल्याने मजूर वर्गाला वाढीव किमतीने दारू घेणे शक्य न झाल्याने त्यांनी दारूचा पर्याय म्हणून सॅनिटायजरचे सेवन करण्यास सुरुवात केली. २३ एप्रिलला सॅनिटायजरचे अति सेवन केल्याने सात मजुरांवर अकाली मरण ओढावले. सॅनिटायजर बळींचे हे सत्र सुरूच असून आज आणखी एका व्यक्तीचा सॅनिटायजर पिल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील माळीपुऱ्यात राहणारा अनिल चंपतराव गोलाईत (४७) याचा सॅनिटायजर पिल्याने २७ एप्रिलला सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास जमादार जगदीश बोरनारवार करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!