क्राईम न्यूज

16-year-old girl from Mumbai was handcuffed in Pune | मुंबईतून १६ वर्षीय मुलीला पळवणा-याला पुण्यात ठोकल्या बेड्या

| युनिट ५ चे अंमलदार प्रमोद पाटील यांची कौतुकास्पद कामगिरी

मुंबई – चोरी असो खून, अपहरण असो व दंगल प्रत्येक परिस्थितीत मुंबई पोलीस उत्तमरित्या कामगिरी करतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मुंबईतील धारावी परिसरातून १६ वर्षीय मुलीला पळवणाºयाला पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही उत्तम कारवाई पोलीस अंमलदार प्रमोद पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट ५ च्या पथकाने केली.

Mumbai Police Unit 5
Mumbai Police Unit 5

असे केले अपहरण

धारावी परिसरात १६ वर्षी मुलगी कुटुंबियांसोबत राहत होती. त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी तानाजी कांबळे (वय २६) राहण्यास आला. शेजारी राहत असताना त्याचे अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे सूत जुळले. प्रेमात वाहत गेलेला कांबळे हा १४ मार्च २०२२ रोजी अल्पवयीन मुलीला घेऊ न पळून गेला. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. २१७ / २०२२, भादंवि कलम ३६३) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला सांगितले. त्यानुसार युनिट ५ चे पथक मुलीचा शोध घेऊ लागले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रमोद पाटील यांनी तात्रिक माहितीचे अचूक विश्लेषण केले असता मुलीला पळवणारा कांबळे हा पुण्यात असल्याचे समजले. त्यानुसार २२ जून रोजी युनिट ५ चे पथक पुण्यात दाखल झाले. धायरी येथील बरंगणी मळा येथून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊ न आरोपी तानाजी कांबळे याच्या मुसक्या आवळल्या. या दोघांना मुंबईत आणले असून, पुढील तपासासाठी त्या दोघांना धारावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कौतुकास्पद कारवाई
करणारे पोलीस पथक

ही कौतुकास्पद कारवाई युनिट ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निर्भवणे, पोलीस अंमलदार प्रमोद पाटील, महिला पोलीस अंमलदार भावना पाटील यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करु नका.