ब्रेकिंगविदर्भ

कोरोनाने 25 जणांचा मृत्यू; एक हजार जण पॉझेटिव्ह

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. 520 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 7158 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2690 तर गृह विलगीकरणात 4468 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50132 झाली आहे. 24 तासात 520 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 41792 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1182 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.54 असून मृत्युदर 2.36 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 64, 65, 72, 75 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष, नेर येथील 77 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 40 व 60 वर्षीय पुरुष, केळापूर येथील 45 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, कळंब येथील 60 व 75 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 77 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 50 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 70 वर्षीय महिला आणि वर्धा येथील 64 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये पुसद येथील 69 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 52 व 66 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 73 वर्षीय पुरुष, वणी येथील 42 वर्षीय पुरुष आहे.

मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1000 जणांमध्ये 593 पुरुष आणि 407 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 301 पॉझेटिव्ह रुग्ण, मारेगाव 110, घाटंजी 106, पांढरकवडा 80, दिग्रस 70, पुसद 66, वणी 53, नेर 49, बाभुळगाव 42, आर्णि 33, झरी 30, कळंब 22, महागाव 11, दारव्हा 10, उमरखेड 9, राळेगाव 2, आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 399847 नमुने पाठविले असून यापैकी 393818 प्राप्त तर 6029 अप्राप्त आहेत. तसेच 343686 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!