ब्रेकिंग

वाघाची शिकार; गुहेच्या तोंडाशी लावली आग

 

यवतमाळ : पांढरकवडा वनविभागांतर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वन कक्षमध्ये गुहे वाघ मृत अवस्थेत आढळला. रविवारी सकाळी 10.30 वाजता ही घटना उघडकीस आली आहे. सदर वाघाची शिकार केल्याची चर्चा आहे.

 

विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक (वन्यजीव), पांढरकवडा, मुकुटबन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांचे प्रतिनिधी तसेच मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विरानी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, दिल्ली यांचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट दिली व वस्तुस्थितीचे पाहणी केली. सदर जागेची तपासणी केली असता वाघ नाल्याला लागून असलेल्या गृहेत मृत अवस्थेत दिसून आला. गळ्यात तारेचा फास अडकल्याचे, अणुकूचीदार हत्याराने मारल्याचे आणि गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जाळलेल्या लाकडांवरून निदर्शनास आले. सदर वाघ मादी असून अंदाजे 4 वर्ष वयाची असण्याची शक्यता आहे. वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडल्याचेही आढळून आले आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, डॉ. अरुण जाधव, डॉ. एस. एस. चव्हाण, डॉ. डी. जी. जाधव व डॉ. व्ही.सी. जागडे यांचेमार्फत मोक्यावर शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्युचे नेमके कारण कळेल. सदर प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा जारी करून गुन्ह्याचा तपास सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा), पांढरकवडा हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!