ब्रेकिंग

सावधान ! यवतमाळात मृत्यूचा खच ; ४५ बळी

 

राहुल वासनिक @ यवतमाळ

————————————–

कोरोनाने आज ४५ जणांचा बळी घेतला असून, मृत्यूतांडव सुरुच आहे. १३२३ जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून ८०३ जण कोरोनामुक्त झाले आहे.
आज सोमवारी एकूण ८१५४ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १३२३ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ४८३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६७०३ रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. यापैकी रुग्णालयात भरती २७३१ तर गृह विलगीकरणात ३९७२ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४९१३२ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 25, 46, 56, 42, 78, 65, 54, 63 वर्षीय पुरुष आणि 44 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 36, 30, 63, 69, 42, 56 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, नेर येथील 35 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 39 वर्षीय पुरुष व 66 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 36 व 68 वर्षीय महिला, दारव्हा येथील 55 वर्षीय पुरुष, वणी येथील 61, 76 वर्षीय पुरुष व 50, 52 वर्षीय महिला, राळेगाव येथील 63 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, झरी तालुक्यातील 85 वर्षीय महिला, पुसद येथील 60 वर्षीय पुरुष आणि आदिलाबाद (आंध्र प्रदेश) येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये दारव्हा येथील 45 वर्षीय महिला, उमरखेड येथील 36 वर्षीय पुरुष, महागाव येथील 70 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 60 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 53, 45, 36 वर्षीय पुरुष, पुसद येथील 65, 67, 45 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला आणि वणी येथील 42 वर्षीय महिला आहे.

तालुका निहाय आकडेवारी
सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1323 जणांमध्ये 744 पुरुष आणि 579 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 280 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 186, दिग्रस 157, दारव्हा 139, पांढरकवडा 133, वणी 70, बाभुळगाव 69, उमरखेड 61, झरी 52, कळंब 46, महागाव 38, आर्णि 38, घाटंजी 22, मारेगाव 13, नेर 6, राळेगाव 6, आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

 

 

 

कोव्हीड रुग्णालयात 1496 बेड उपलब्ध
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराला जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून बरे होण्याचे प्रमाणसुध्दा वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटल आणि 33 कोव्हीड केअर सेंटरमार्फत रुग्णांवर उपचार सुरू आहे. बेडच्या उपलब्धतेबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून अद्यापही जिल्ह्यातील विविध कोव्हीड रुग्णालयात 1496 बेड उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतिरिक्त 280 बेडचे नियोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!