‘त्या’ विस करोनाबाधितांवर गुन्हे दाखल

महेंद्र देवतळे @ घाटंजी
————————————-
येथील कोविड केअर केंद्रातून 20 करोनाबाधित रुग्ण उपचार न करता शनिवारी पळून गेले होते. या प्रकरणी पारवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा कोविड केअर केंद्र प्रमुख डाॅ. संजय पुराम यांच्या तक्रारीवरून 20 करोनाबाधित रुग्णा विरुद्ध भादंवि 288, 269, 270 साथरोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3, 4 सह कलम कोविड 19 उपाययोजना सन 2020 नियम 11 अन्वये घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहे.
घाटंजी येथील कोविड केअर केंद्रावरून विस कोविड रुग्ण पळुन गेल्या प्रकरणी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, कोविड केअर केंद्र प्रमुख, आरोग्य सेविका आदीं विरुद्ध तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
घाटंजी तालुक्यात एकून 45 करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना घाटंजी येथील कोविड केअर केंद्रावर गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळी घाटंजी येथील कोविड केअर केंद्रावरून विस कोविड रुग्ण पळून गेल्याने जिल्यात एकच खळबळ माजली. पळून गेलेल्या कोविड रुग्णाला आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या माध्यमातून पाहण्यात आले. परंतु, त्यात यश आले नाही. त्यामुळे घाटंजी येथील कोविड केअर केंद्राची जबाबदारी असलेले पारवा येथील वैद्यकीय अधिकारी डाँ. संजय पुराम यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.
घाटंजी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार आनंदराव वागतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुनिल केवट पुढील तपास करीत आहे.
घाटंजी येथील कोविड केअर केंद्र प्रमुख डाँ. संजय पुराम, तालुका आरोग्य अधिकारी डाँ. धर्मेश चव्हाण आदींशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता, त्यांनी आपली कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.