विदर्भ

विलगिकरण केंद्र अधिक सक्षम करण्याची गरज – साहेबराव पवार

 

यवतमाळ : तालुकास्तरावर असलेल्या विलगीकरण केंद्रांमध्ये आवश्यक त्या वैद्यकीय व भौतिक सुविधा नसल्याने अनेक रुग्ण तिथे जाण्यास टाळाटाळ करत आहेत. त्या केंद्रांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी पुरेशा प्रमाणात नसल्याने रुग्णांना योग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाने नवीन विलगीकरण केंद्र बनविण्याऐवजी आधी आहे त्या केंद्रांमध्ये योग्य सुविधा द्याव्या जेणेकरून लोक विलगीकरणाला टाळाटाळ करणार नाहीत. सध्या ग्रामीण भागातील अनेक रुग्ण चाचणी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे समस्या आणखी गंभीर होत आहे.
रुग्णांनी गैरसोय होत असल्यास त्याची सूचना लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना द्यावी. विलगीकरण केंद्रातून पळून जाणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. त्यामुळे आपल्या जवळच्या लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. नागरिकांनी जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करावे. घाटंजी येथे झालेली घटना अत्यंत चुकीची आहे. मात्र प्रशासनाने गैरसोयींकडे लक्ष देणे देखील तितकेच आवश्यक आहे.

साहेबराव पवार,
सामाजिक कार्यकर्ता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!