ब्रेकिंग
सॅनिटायझर प्राशन केल्याने सात जणांचा मृत्यू

नशा करणे महागात पडले, वणी येथील घटना
यवतमाळ : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाउन केले आहे. देशी-विदशी दारुचे दुकाने बंद असल्याने तडीराम आता गावठी दारुकडे वळल्याचे चित्र आहे. पैसे खर्च करण्याची तयारी असूनही दारू मिळत नसल्याने तडीराम नवीन शक्कल लढवितांना पहावयास मिळत आहे. अशाच प्रकारातून सॅनिटायझर प्राशन केल्याने सात जणांचा मृत्यू झाला. वणी शहरात ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.
दत्ता लांजेवार ,विजय बावणे, नूतन पाटणकर, संतोष मेहरे, सुनील ढेंगळे, गणेश शेलार, भारत रुईकर रा. तेली फैल वणी अशी मृतांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी ग्रामिण रुग्णालयात भेट दिली.