आरोग्य व शिक्षणक्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ

घाटंजीच्या कोव्हीड सेंटर मधून १९ जणांचे पलायन ? 

 

महेंद्र देवतळे @ घाटंजी (यवतमाळ)
……………………..
यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून मृतदेह बेपत्ता असल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असतांना घाटंजी येथील कोव्हीड सेंटर मधून १९ रुग्णांनी पलायन केल्याची धकादायक माहिती पुढे आली आहे. या बाबत तालुका प्रशासनासह आरोग्य विभागांच्या अधिका-यांना माहिती मागण्याचा प्रयत्न केला असा, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार किती ढिसाळ आहे हे दिसून येते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जग हतबल झालं असून उपाययोजनेसाठी आटापिटा करून सुद्धा कोरोना आटोक्यालत येत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी वेळ आलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी लागलेल्या आगी व अपुऱ्या उपाययोजनांमुळे रुग्ण व आरोग्य यंत्रणेमध्ये कटुता निर्माण होत असल्याचे पहावयास मिळत आहे. घाटंजी येथील कोव्हीड सेंटरमधुन तब्बल १९ जणांनी सकाळी पलायन केल्याची चर्चा आहे. पलायन करणा-मध्ये आमडी, शिरोली व वागदा या गावातील रुग्णाचा समावेश आहे. एकाच वेळी पॉझिटिव्ह आलेल्या १९ रुग्णांनी पलायन केल्यामुळे घाटंजी येथील कोव्हीड सेंटर मधील निष्काळजीपणा आता चव्हाट्यावर आला आहे. मात्र सायंकाळ पर्यंत घाटंजी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नव्हती. महसूल प्रशासन, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

तक्रार देणार
घाटंजी येथील कोव्हीड सेंअरमध्ये भरती असलेल्या एका रुग्णांच्या मुलाने जेवनाचा डब्बा आणला होता. मात्र त्या कोव्हीड सेंटमध्ये वडील दिसले नाही. त्यामुळे त्याने  प्रतिनिधी सोंबत संपर्क साधला. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधींनी कोव्हीड सेंटरला भेट देवून कर्तव्यावर असलेल्या संबंधित डॉक्टरांना विचारणा केली असता, रुग्णां सदर्भात आम्ही माहिती गोळा करीत असून, तक्रार देणार असल्याचे सांगितले. तर तालुका प्रशासन व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांसोत संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!