अडेगावात नवरदेवासह पाच जणांविरुद्ध गुन्हा,स्वागत समारंभाला तोबा गर्दी

झरी : अडेगाव येथील लग्नाच्या स्वागत समारंभाला ३०० लोकांनी गर्दी केली होती. या बाबतची माहिती मिळताच मुकुटबन पोलीसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असून, नवरदेवासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नवरदेव मंगेश श्रीराम चिचुलकर (26) ,शंकर दादाजी झाडे (38)] वैभव लक्ष्मन चिचुलकर(22), श्रीराम चिंचुलकर (56), विशाल चिंचोलकर(18)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अडेगावात लग्नाच्या स्वागत समारंभाला गर्दी झाल्याची माहिती मुकुटबन पोलिसांना मिळाली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी,पोलीस पाटील यांना विचारणा केली असता लग्नासाठी कुठलिही परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी दंड देण्याकरीत गेले असता त्यांच्यासोबत हुज्जत घातली. नियमाची पायमली केल्याने नवरदेव मंगेश चिचुलकर,शंकर झाडे, वैभव चिचुलकर, श्रीराम चिंचुलकर, विशाल चिंचोलकर याच्याविरुद्घ गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज राठोड ,पोलीस शिपाई जितेश पानघाटे करीत आहे.