कोरोनाचे २० बळी, ११६३ जण पॉझेटिव्ह

यवतमाळ : जिल्ह्यात कोरानाने २० जणांचा बळी गेला असून, ११६३ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर १०११ जण कोरोनामुक्त झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पाच मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५९७२ रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. त्यापैकी रुग्णालयात भरती २८५८ तर गृह विलगीकरणात ३११४ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४६७०४झाली आहे.
जिल्ह्यात एकूण १०७३ मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६६, ७०, ४९ वर्षीय पुरुष आणि ८०, ८३ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, आर्णि येथील ८० वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ६८ वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील ८५ वर्षीय पुरुष, हिंगणघाट (जि. वर्धा) येथील ६० वर्षीय पुरुष, माहूर (जि. नांदेड) येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये पांढरकवडा येथील ३०, ६० वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला, दारव्हा येथील ७५ वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील ८५ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ४९ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ५२ वर्षीय पुरुष, नांदेड येथील ६२ वर्षीय महिला आणि नागपूर येथील ४६ वर्षीय पुरुष आहे. जिल्ह्यातील ३३ कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण २५७३ बेडपैकी १४४५ उपयोगात, ११२८ शिल्लक आहे. २३ खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण ७९५ बेडपैकी ६१९ उपयोगात असून, १७६ बेड शिल्लक आहेत.