ब्रेकिंगमहाराष्ट्र
सुधारीत वेळापत्रक : दहावी-बारावीची परिक्षा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर बारावीची परिक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २१ मे ते १० जून पर्यंत होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून या कालावधीत होणार आहे. सुधारित वेळापत्रक www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.