क्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ

९१ कुमारीकेवर लादले मातृत्व

 

यवतमाळ : जिल्ह्यात आदिवासी भाग असलेल्या झरी तालुक्यात ३० तर अन्य भागात ६१ अशा एकुण ९१ कुमारीकेवर अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादले आहे. महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालभवन तसेच कुमारी मातांच्या पुनर्वसनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ही माहिती उघड झाली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कुमारी मातांच्या संदर्भात सादरीकरण केले. जिल्ह्यात एकूण ९१ कुमारी माता असून सर्वाधिक झरीजामणी तालुक्यात ३० कुमारीमाता आहे. सर्व महिला ह्या १८ वर्षांवरील असून त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांकरीता जिल्ह्यात नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर सामाजिक न्या भवनाच्या धर्तीवर जिल्ह्यात महिला व बालभवन तयार करण्यात येईल. यात हिरकणी कक्ष, अभ्यांगत कक्ष, महिला बचत गटासाठी कक्ष, मिटींग सभागृह आदींची निर्मिती करण्यात येईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितले. : जिल्ह्यात झरीजामणी, पांढरकवडा, मारेगाव तसेच इतर आदिवासी बहुल भागातील कुमारी मातांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ब-याच वर्षांपासून प्रलंबित आहे. या महिलांना विविध योजनेतून लाभ देऊन सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांचे रोजगाराभिमुख पुनर्वसन करावे, अशा सुचना महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी दिल्या. यावेळी आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!