आरोग्य व शिक्षणब्रेकिंगविदर्भ

तिस-या दिवशीही कोरोनाचा ब्लास्ट, 10 जणांचा मृत्यू

 

यवतमाळ :  जिल्ह्यात कोरोनाने 10 जणांचा मृत्यू झाला असून, 556 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर 286 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 75, 78, 62, 71 वर्षीय पुरुष आणि 60, 65 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिला, दिग्रस येथील 52 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 62 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.23) पॉजिटिव आलेल्या 556 जणांमध्ये 393 पुरुष आणि 163 महिला आहेत. यात यवतमाळातील 234, राळेगाव 59, दारव्हा 53, उमरखेड 40, दिग्रस 39, पांढरकवडा 39, पुसद 29, कळंब 23, नेर 13, वणी 6, बाभुळगाव 6, घाटंजी 5, आर्णि 3, मारेगाव 2, झरीजामणी 2 आणि 3 इतर शहरातील रुग्ण आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!