ब्रेकिंगविदर्भ

सोनेगाव शिवारात वाघिणीचा मृत्यू


यवतमाळ : .जिल्ह्यातील मारेगाव वनपरीक्षेत्रात येत असलेल्या सोनेगाव शिवारात वाघीणीचा मृत्यू झाल्याने खडबळ उडाली आहे. मारेगाव वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सोनेगाव शिवारातील आसन (उजाड) क्षेत्रात दिड क्विंटल वजनाची वाघिण मृतावस्थेत आढळली. वनविभागाच्या चमुने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
मारेगाव वनपरीक्षेत्रात येत असलेल्या शिबला जंगलात गेल्या अनेक दिवसांपासून वाघिणीचे वास्तव्य होते. परीसरात वाघ व वाघिणीच्या हल्ल्यात अनेक जनावरे जखमी झाल्याच्या घटना घडतात. आज २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताचे सुमारास सोनेगाव शिवारात एका दिड क्विंटल वजानाचा पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाला आहे. शेताला लावलेल्या तारेच्या कुंपनाला हा फास त्याच्या गळ्यात अडकल्याने वाघिणीचा मृत्यु झाला असावा असा अंदाज लावला जात आहे. घट नास्थळी पांढरकवडा उपवनसंरक्षक किरण जगताप, एसीएफ दुमारे, वनपरीक्षेत्राधिकारी विक्रांत खाडे व पथक दाखल झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!