क्राईम न्यूजग्रामीणब्रेकिंगविदर्भ

चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश, १२ गुन्ह्याचा उलगडा, पाच आरोपी जेरबंद

 

यवतमाळ : दुकान, मंदीर फोडून चोरी करण्यासह मोटारसायकल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पाच आरोपींना जेरबंद केले असून, त्याचशयाकडून आठ दुचाकीसह ३ लाख ४४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीतील सदस्यांनी १२ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. अवधूतवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.
गोलु उर्फ रामेश्वर जोमीवाडे, अविनाश लंगोटे, विशाल कोंडुरकर, सागर मानकर, वैभव महल्ले अशी आरोपींची नावे आहे. २२ फेब्रुवारी रोजी वडगाव ते एमआयडीसी रोड परिसरात बोलत असलेल्या मुला-मुलींना तीन ते चार अनोळखी इसमांनी मारहाण करून छेड काढून मोबाईल हिसकावुन नेला होता. या प्रकरणी अवधूतवाडी डि.बी. पथकाने गोलु उर्फ रामेश्वर जोमीवाडे, अविनाश लंगोटे याना अटक केली. आरोपींची कसुन विचारपुस केली असता अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरून नांदेड जिल्हयातील सारकिन्ही येथो विकल्याची कबुली दिली. त्यावरुन पोलिसांनी विशाल कोंडुरकर, सागर मानकर, वैभव महल्ले यांना ताब्यात घेवून त्याच्याकडून तीन मोटारसायकल व अन्य आरोपीकडन पाच अशा एकुण आठ मोटारसायकल जप्त केल्या. आरोपींनी सिद्धी विनायक मंदिर ओम कॉलनी, रोहीत सुपरमार्ट राणाप्रपात गेट, ज्ञानेशवर मंदिर बाजोरीया नगर, गजानन मंदीर सिंघानिया नगर, संकटमोचन देवी मंदिर उमरसरा, मॉ वैष्णवी देवी मंदिर उमरसरा आदी पाच मंदिर व एका दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून ३ लाखा ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ (पाटील), अपर पोलीस अधीक्षक खेंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे, डीबी पथाकाचे पोलीस उपनिरिक्षक राहुल गुहे, नासीर शेख, सुरेश मेश्राम, लिलाधर वानखडे, प्रशांत, नितीन सलाम, सुभाष नागदिवे, अश्विन पवार, सागर चिरडे, अविनाश ढोणे, बबलु पठाण, शैलेश मुंडे, समाधान कांबळे, सुधिर पुसदकर, सूरज शिंदे, रवी शेडमाके, गणेश राठोड, रुपेश लांभाटे, प्रकाश चरडे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!