
यवतमाळ : कोरोनामुळे जिल्ह्यात १३ जणांचे बळी गेले आहे. तर२४७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. ३०५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ६९, ६७, ८७, ३६ वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील १८ वर्षीय पुरुष,७८ वर्षीय महिला, दिग्रस येथील ७५ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ७८ वर्षीय पुरुष आणि ६३ वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुष आणि ५६ वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील ८४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तसेच पॉजिटिव आलेल्या २४७ जणांमध्ये १७३ पुरुष आणि ७४ महिला आहेत. यात यवतमाळातील१०१, पुसद २९, दिग्रस ३३, बाभुळगाव २०, मारेगाव १३, घाटंजी १२, नेर १२, राळेगाव ७, दारव्हा ६, वणी ६, कळंब ३, पांढरकवडा२, आर्णि २ आणि १ इतर शहरातील रुग्ण आहे.