क्रीडा व मनोरंजनब्रेकिंगविदर्भ

व्यायाम करण्यासाठी गेलेला तरुण ठार

मोहदा (यवतमाळ) : व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदर तरुण जागीच ठार झाला. मोहदा-आसोली मार्गावर आज शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
श्रेयस नरेंद्र नगराळे (१९) रा. मोहदा असे मृतकाचे नाव आहे. श्रेयश हा दररोज व्यायाम करण्यासाठी मोहदा ते आसोली रस्त्याने जात होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या दरम्यान व्यायाम करण्यासाठी गेला होता. अशातच त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्य झाला. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, जमादार प्रेमदास फुलके, राजू रणमले, सिद्धार्थ कांबळे, पोलीस पाटील पियुष गब्रानी यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला. त्याच्या मागे वडील, आई ,भाऊ असा आप्त परिवार आहे. मोहदा मोक्षधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करणयात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!