विदर्भ

चवदार तळे सत्याग्रह स्मरण दिन

 

घाटंजी : येथे विश्वरूप फाउंडेशन च्या वतीने चवदार तळे सत्याग्रह स्मरण दिन स्थानिक जयभीम चौकात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश जाधव होते. यावेळी विश्वरूप फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेबानी चवदार तळे सत्याग्रह करुन हे तळे सर्वच बहुजनांकरिता कायमस्वरूपी खुले केले. त्यांच्या मुलभूत गरजांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बी टी वाढवे यांनी व्यक्त केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपनीस व अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते होते. समता, न्याय, बंधूता व स्वातंत्र्य या तत्त्वाचे पालन करून समाजातील दलित शोषित पीडित वंचित समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे अशाच पद्धतीचे सामाजिक व राजकीय कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते. असे मत सुनील नगराळे यांनी व्यक्त केले.

प्रसंगी विश्वरुप फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष ओंकार, उपाध्यक्ष शुभम नगराळे, विजय गजबे, अजय गजबे, दूधनाथ गजबे, उमेश घरडे, मोहन पेटेवार या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जितेंद्र मुनेश्वर यांनी संचालन तर आभार सुजल भालेराव यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!