आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

अरेबापरे…कोरोनाचा स्फोट : १४ जणांचा मृत्यू

३८२ जण पॉझेटिव्ह, ४३० जण कोरोनामुक्त

यवतमाळ : जिल्हयात कोरोनाचा स्फोट झाला असून, दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८२ जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून ४३०  जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ७२,७९,८०,४५,५०,५८,८३  वर्षीय पुरुष आणि ६३ वर्षीय महिला, पुसद येथील ८५ वर्षीय महिला, महागाव येथील ७८ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५१ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ४० वर्षीय महिला, केळापुर तालुक्यातील २६ वर्षीय महिला आणि माहुर (जि. नांदेड) येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या ३८२ जणांमध्ये २६७ पुरुष आणि ११५ महिला आहेत. यात यवतमाळातील १८४, पुसद ४८, दिग्रस ४७, वणी ३४, उमरखेड़ १७, कळंब १४, महागाव १०, दारव्हा ८, पांढरकवडा ६, नेर ४, घाटंजी ४, झरी २, आर्णी १, मारेगाव १, रालेगाव १ आणि १ इतर शहरातील रुग्ण आहे. रविवारी एकूण ५०२० रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ३८२ जण नव्याने पॉझेटिव्ह आले. तर ४६३८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०३६  ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २४५९३ झाली आहे. २४ तासात ४३० जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २१९९७ आहे. तर जिल्ह्यात एकूण ५६० मृत्युची नोंद आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!