क्राईम न्यूजब्रेकिंगविदर्भ
कोरोना सेंटरमधून कैदी फरार

वर्धा – सेलू पोलीस स्टेशन मधील कैदी कोरोना बाधित असल्याने त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले .मात्र कैदी आज पहाटेच्या सुमारास रुग्णालयातून पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
ओमप्रकाश सडमाके वय 30 रा. सेलू असे कैद्याचे नाव आहे. सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपीने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या आरोपाखाली त्याला वर्धा कारागृहात ठेवण्यात आले .त्याची प्रकृती बिघडल्याने कोरोना चाचणी करण्यात आली .त्यांचा अहवाल कोरोना बाधित आल्याने उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालय येथील कोविडं सेंटरमध्ये 16 मार्च रोजी भरती करण्यात आले. 18 मार्च च्या पहाटे च्या सुमारास पळून गेला.
या घटनेची सेवाग्राम पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात करीत आहे.