कोरोनाचे सात बळी, ३२५ पॉझेटिव्ह

यवतमाळ : जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यान वाढत असून, आज कोरोनाने सात जणांच बळी घेतले. तर २४ तासात ३२५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. गत दोन दिवसात बरे झालेल्या जवळपास १७०२ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गुरुवारी जिल्ह्यात आढळलेल्या पॉझेटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणा-यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे.
मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ६६, ६२ आणि ४३ वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, पुसद येथील ६५ वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील ८३ वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील ७५ वर्षीय पुरुष आहे. गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या ३२५ जणांमध्ये २७४ पुरुष आणि ५१ महिला आहेत. यात यवतमाळातील १०५, पुसद ५४, दिग्रस ३८, उमरखेड ३७, आर्णि १४, पांढरकवडा १३, नेर १२, राळेगाव १२, घाटंजी ११, वणी ११, महागाव ८, दारव्हा ५, बाभुळगाव २, कळंब १ आणि इतर ठिकाणचे २ रुग्ण आहे. गुरुवारी एकूण ४८८४ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ३२५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ४५५९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०४१ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २३२१४ झाली आहे. २४ तासात ६९५ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २०६४२ आहे. तर जिल्ह्यात एकूण ५३१ मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत २१५१५९ नमुने पाठविले असून यापैकी २०५८७० प्राप्त तर ९२८९ अप्राप्त आहेत. तसेच १८२६५६ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे.