दिलासादायक :१००७ जण कोरोनामुक्त,चार जणांचा मृत्यु, ४३५नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, आज बुधवारी तब्बल १००७ जण कोरोनामुक्त झाले. तर जिल्ह्यात चार जणांचा मृत्यु झाला असून, ४३५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 78 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 69 वर्षीय पुरुष आणि दिग्रस तालुक्यातील 72 वर्षीय पुरुष आहे. बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 435 जणांमध्ये 326 पुरुष आणि 109 महिला आहेत. यात यवतमाळातील 159, पुसद 87, दिग्रस 59, दारव्हा 49, पांढरकवडा 19, बाभुळगाव 15, उमरखेड 14, महागाव 13, नेर 5, वणी 4, आर्णि 3, झरीजामणी 2, घाटंजी 1, मारेगाव 1 आणि इतर ठिकाणचे 4 रुग्ण आहे.बुधवारी एकूण 6181 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 435 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5746 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2418 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 22889 झाली आहे. 24 तासात 1007 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 19947 आहे. तर जिल्ह्यात एकूण 524 मृत्युची नोंद आहे.
आस्थापना व दुकानांच्या वेळेत बदल
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना सोमवार ते रविवार या सातही दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरु राहतील. दुध विक्रेते / डेअरी यांची दुकाने सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांची दवाखाने त्यांच्या औषधी दुकानांसह), पेट्रोल पंप व गॅस वितरण कोणत्याही निर्बंधाशिवाय नियमित वेळेनुसार सुरू राहतील, असे जिल्हा प्रशासनाच्या आदेशात नमुद आहे.