
नवी दिल्ली :कोरोनाची दुसरी लाट आली असून, देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना संद र्भात पंतप्रधाण नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखणे गरजे असून, त्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादर्भाव वाढल्यास रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची टेस्ट करणे गरजेचे आहे. संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना कमीत कमी वेळात शोधून काढणं आणि आरटीपीसीआर टेस्ट ७० टक्क्यांपेक्षा अधिक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.