क्राईम न्यूजब्रेकिंगमहाराष्ट्र
मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्त करण्यात आली. परमबीरसिंग यांची बदली होणार अशी चर्चा महाराष्ट्र पोलीस दलात सुरू होती. अखेर आज परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. परमबीर सिंग यांना होमगार्ड (गृहरक्षक) दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.