ब्रेकिंगमहाराष्ट्र

विदर्भ- मराठवाड्यात पावसाची शक्यता

 

 

मुंबई : उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून पारा वाढला आहे. गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाला असून, विदर्भ- मराठवाड्यात पाउस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. १८ ते २१ मार्च दरम्यान पाउस येण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १८ मार्च ते २१ मार्च दरम्यान वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकर्‍यांच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीवर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!